Big Recruitment In India : धनत्रयोदशीपासून केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 10 लाख भरतीची अंमलबजावणी सुरु होणार, जाणून घ्या रिक्त पदे व विभाग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Recruitment In India : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्र सरकारच्या (Central Govt) विभागांमध्ये 10 लाख भरती करण्याची घोषणा (Declaration) केली होती. आता त्याची अंमलबजावणी धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi) सुरू होणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 75,000 नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान कर्मचाऱ्यांना संबोधित करणार असल्याचे पीएमओने म्हटले आहे.

जूनमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 10 लाख लोकांची भरती केली जाईल. म्हणजेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ही भरती मोहीम पूर्ण केली जाईल.

संरक्षण मंत्रालयात सर्वाधिक भरती होत असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. अडीच लाख पदे रिक्त आहेत. याशिवाय रेल्वेत 2.9 लाख पदे भरायची आहेत. त्याच वेळी, गृह मंत्रालयामध्ये, सी श्रेणीच्या 1.2 लाख रिक्त पदांसाठी भरती केली जाईल.

या 10 लाख नोकऱ्यांपैकी एकूण 23,000 पदे राजपत्रित अधिकाऱ्यांची आहेत. याशिवाय 26 हजार ब गटातील आहेत. त्याचवेळी अराजपत्रित ब श्रेणीतील 92 हजार पदेही रिक्त आहेत. सर्वाधिक 8.4 लाख पदे सी गटातील आहेत, ज्यांच्या भरतीमुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगार मिळणार आहे.

या भरतीसाठी केंद्र सरकारच्या सर्व विभागांकडून प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. पहिल्या फेरीत एकूण 38 विभागांना 75 हजार नवीन कर्मचारी मिळणार आहेत. UPSC, SSC, रेल्वे भरती बोर्ड आणि इतर संस्थांमार्फत एकूण 10 लाख पदांसाठी (Post) भरतीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

या पदांवर लिपिक, प्राप्तिकर अधिकारी, कॉन्स्टेबल ते केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकारी अशा पदांच्या जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारवर नोकरभरती होत नसल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी 10 लाख नोकऱ्या देऊन अशा सर्व आरोपांना फाटा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.