BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोजरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम ठरेल.
बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर सीएच. हॉस्पिटल अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सहायक प्राध्यापक पदासाठी उमेदवार MD/MS/DNB (Obstetrics & Gynecology) हवा. शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारच येथे अर्ज करण्यास पात्र असतील. येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 38 वर्षे ते ४३ वर्षे इतकी आहे. तर अर्ज शुल्क 580/- + GST 18% सह भरायचे आहेत.
इच्छुक उमेदवार अर्ज डिस्पॅच विभाग, T. N चा तळमजला. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात. तर पोस्टाने अर्ज सादर करणायची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही https://www.mcgm.gov.in/
या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
-अर्ज पाठवताना लक्षात घ्या अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती