BMC Bharti 2024 : पदवीधारक उत्तीर्णांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; लवकर करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या भरती सुरु आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी एकदम उत्तम आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे असून, उमेदवारांनी भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखेपूर्वी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून L. L. B. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि बार कौन्सिलचे सनद असणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन
पद्धतीने कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.