BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे नोकरीची संधी; येथे पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे, जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वेगवगेळ्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

ही भरती मुंबईत सुरु असून, अर्ज कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यासाठी अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून L. L. B. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि बार कौन्सिलचे सनद असणे आवश्यक आहे. या संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.