जॉब्स

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना मिळणार नोकरी, बघा पात्रता

Published by
Ahmednagarlive24 Office

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास भरती सूचना कळजीपूवक वाचा.

वरील भरती अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल…

मानव संसाधन समन्वयक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

या भरती साठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे इतकी आहे, तसेच यासाठी अर्ज शुल्क देखील आकारले जाणार आहेत, खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900/- रुपये इतके शुल्क आहेत.

इच्छुक उमेदवार अर्ज https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ या लिंकद्वारे सादर करू शकतो, लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी पासून सुरु होईल, दिलेली लिंक तेव्हाच काम करेल. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे 24 फेब्रुवारी पासून करायचे आहेत, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office