BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरु आहे भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सपोर्ट स्टाफ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. लक्षात घ्या या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला नाही.

या भरतीसाठी १० वी पास उमेदवार अर्ज करू शकतात, तसेच उमेदवाराकडे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे, अर्ज बालरोग विभाग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यासाठी https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

-अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, लक्षात घ्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदर अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.