ESIC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे एकूण 17710 पदांवर भरती होणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी येथे अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत “बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक” पदांच्या एकूण 17710 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज 30 दिवसांच्या आत पाठवायचे आहेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 17710 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे इतकी असेल.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
येथे अर्ज करण्यासाठी e1hq@esic.nic.in या ईमेलचा वापर करा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील पदांसाठी अर्ज निशांत कुमार, उपसंचालक, DPC सेल, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, CIG रोड, नवी दिल्ली-110002. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
-आधी ई-मेल मग दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जात सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.