Canara Bank Bharti 2024: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि उत्तम पगाराच्या शोधात आहात आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी देशातील नावाजलेली सरकारी बँक म्हणजेच कॅनरा बँक या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असते. विविध क्षेत्रातील पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.

Canara Bank Bharti 2024 Details
कॅनरा बँक अंतर्गत जी भरती होत आहे या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जसे की अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली सविस्तरपणे सांगितली आहे –
पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस (सदरील भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे).
पदसंख्या: या भरतीसाठी एकूण 3,000 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अर्ज करण्याची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क: या भरतीसाठी कर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वयोमर्यादा: 20 ते 28 वयोगटातील सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी निवड कशी केली जाईल?
Canara Bank Bharti: कॅनरा बँक अंतर्गत ही भरती होत आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वरे केली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी खाली दिलेली आहे त्यानुसार तुमच्याकडे संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
जर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करत असाल तर खाली दिलेले कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे-
- आधार कार्ड / मतदान कार्ड / पासपोर्ट (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर आवश्यक प्रमाणपत्रे
- या क्षेत्रात अनुभव असल्यास अनुभवी प्रमाणपत्र
- इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज सुरू | 21 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
महत्त्वाच्या लिंक्स :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.canarabank.com |