जॉब्स

Career Tips: तुम्ही देखील जॉब सोडत आहात का? तर कंपनीकडून मिळवा ही कागदपत्रे, होईल फायदा

Published by
Ajay Patil

Career Tips:- आजकालचे तरुणाई एका कंपनीमध्ये जास्त वेळ जॉब करत नाहीत. ज्या ठिकाणाहून जास्त पगार मिळेल त्या कंपनीमध्ये जॉब करायला सुरुवात केली जाते व आधीच्या कंपनीमधील जॉब स्विच केला जातो व इतर कारणांमुळे देखील जॉब सोडण्याचे प्रमाण वाढते.

तसे पाहायला गेले तर जॉब स्विचिंग एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे व यामध्ये आपल्याला अनेक नवीन जबाबदाऱ्या आणि नवनवीन प्रक्रिया शिकता येतात व यातून अनेक दृष्टिकोनातून विकास होत असतो. परंतु बऱ्याचदा आपण कंपनीला एखादा अर्ज करून आपला जॉब सोडतो.

परंतु यामध्ये तुम्ही जॉब सोडताना तुमच्या जुन्या कंपनीकडून काही महत्त्वाची कागदपत्रे देखील घेणे गरजेचे असते. अशा प्रकारचे कागदपत्रे ही तुमच्या भविष्यामध्ये खूप फायद्याची ठरू शकतात.

याबद्दल बऱ्याच जणांना अजून देखील माहिती नाही. त्यामुळे तुम्ही जर तुमची जुनी कंपनी सोडून नवीन कंपनीत जॉबला सुरुवात करत असाल तर जुन्या कंपनीकडून कोणती कागदपत्रे घ्यावीत? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 कंपनी सोडताना कंपनीकडून घ्या ही कागदपत्रे

1- रिलीविंग लेटर जेव्हा आपण कंपनीचा जॉब सोडतो तेव्हा हे लेटर कंपनी सोडण्याचे एक अधिकृत पत्र असते. यामध्ये तुमचे नाव तसेच तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात त्याबद्दलची माहिती तसेच किती कालावधी करिता सेवा दिली व का कंपनी सोडली याचे कारण नमूद केलेले असते.

2- एक्झिट इंटरव्यू फॉर्म बऱ्याच कंपन्यांमध्ये एक्झिट इंटरव्यू घेतली जाते. या मुलाखतीमध्ये कंपनीला तुमचे काम करण्याची पद्धत आणि कंपनी बद्दलचे तुमचे मत काय आहे ते माहिती करून घ्यायचे असते व ही इंटरव्यू घेतल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिला जातो.

3- फॉर्म 16- हा फॉर्म तुम्हाला कंपनीत मिळालेले उत्पन्न आणि त्यावर भरलेल्या कर इत्यादींचा तपशील दर्शवतो. तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरतात तेव्हा हा फॉर्म आवश्यक असतो.

4- पीएफ खाते बंद करण्याचे प्रमाणपत्र जर तुम्ही अगोदरच्या कंपनीच्या पीएफ योजनेमध्ये सहभागी असाल तर तुमचे पीएफ खाते बंद करण्याचे प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची पीएफ खात्यातील एकूण रक्कम आणि त्यातील व्याज इत्यादी नमूद केलेले असते.

5- ग्रॅच्युईटी प्रमाणपत्र तुम्ही जर काही वर्षांपर्यंत कंपनीमध्ये काम केले असेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळवण्याचा हक्क असतो व अशा पद्धतीचे ग्रॅज्युएटीचे प्रमाणपत्र मिळवून तुम्ही ती रक्कम मिळवू शकता.

6- वेतन पत्रांच्या प्रति अगोदरच्या कंपनीत तुम्हाला मिळालेले पगार म्हणजेच वेतन पत्रांच्या प्रति ठेवणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये कुठल्याही कारणामुळे तुम्हाला या वेतन पत्रांची गरज भासू शकते.

7- तुम्हाला कंपनीकडून मिळालेली प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा बोनसचे प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्र तुम्ही सोबत ठेवणे गरजेचे आहे.

 कसे मिळवाल ही कागदपत्रे?

1- याकरिता तुम्हाला तुमच्या एचआर विभागाला म्हणजेच विभाग प्रमुखाला तुमच्या जॉब सोडण्याचे किंवा निघून जाण्याची माहिती द्यावी लागते.

2- तसेच वर उल्लेख केलेली ही कागदपत्रे देण्याची त्यांना विनंती करा.

3- काही कंपन्यांमध्ये ही कागदपत्रे ऑनलाईन मिळवण्याची सुविधा असते.

4- तसेच ही कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्या व त्यांच्या प्रति स्वतःजवळ ठेवा.

 काय आहे या कागदपत्रांचे महत्त्व?

1- आयुष्यामध्ये नोकरी शोधताना ही कागदपत्रे खूप उपयोगी पडू शकतात.

2- तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ही कागदपत्रे आवश्यक असतात.

3- तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक असतात.

4- कोणत्याही कायदेशीर प्रकरणात ही कागदपत्र तुमच्यासाठी पुरावा म्हणून काम करतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil