Central Bank of India Bharti : बँकेत नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “सल्लागार (निवृत्त अधिकारी)” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील, तसेच उमेदवारांना कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज महाव्यवस्थापक, HCM विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई 400021 या पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 31 मे 2024 पर्यंत सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचावी.