जॉब्स

Commerce Career Option : 12 वी कॉमर्सनंतर हे 4 आहेत करिअरचे बेस्ट पर्याय, कमवू शकता बक्कळ पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

Commerce Career Option : सध्या देशभरात बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. बारावीची परीक्षा झाल्यानंतर अनेकांना कुठे आणि कशाला प्रवेश घेयचा आसा प्रश्न पडत असतो. 12 वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम पगाराची नोकरी हवी असते. त्यासाठी त्यांना चांगल्या कॉलेजला प्रवेश घेईचा असतो. 12वी कॉमर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या 4 चांगल्या संधी आहेत.

1. चार्टर्ड अकाउंटंट (CA)

12वी कॉमर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंटला प्रवेश घेण्याची चांगली संधी आहे. या ठिकाणी प्रवेश घेऊन 12वी कॉमर्सचे विद्यार्थी चांगले करिअर बनवू शकतात. करांची गणना करण्यासाठी आणि आर्थिक सल्ला देण्यासाठी CA असतात.

CA चे काम कंपन्या आणि व्यक्तींच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब ठेवणे असतो. सीए कर सल्ला देतात आणि कर रिटर्न भरण्यात देखील मदत करत असतात. CA द्वारेच आर्थिक नोंदींचे ऑडिट केले जाते. CA आर्थिक व्यवस्थापन, बजेट आणि गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात.

2. कंपनी सचिव (CS)

कायदेशीर व्यवहार, प्रशासकीय कार्ये आणि मंडळाच्या बैठका व्यवस्थापित करण्याचे काम कंपनी सचिव म्हणजेच CS चे असते. CS कंपनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमांचे पालन करत आहे की नाही याचे देखील खात्री करत असतात. 12वी कॉमर्स उत्तीर्ण झालेले विद्यार्थी CS ला देखील प्रवेश घेऊ शकतात.

3. खर्च आणि व्यवस्थापन लेखापाल (CMA)

12वी कॉमर्स उत्तीर्ण झालेले विद्यार्थी CMA ला म्हणजेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्सला देखील प्रवेश घेऊ शकतात. यामध्ये देखील अनेक नोकऱ्या आहेत. कंपनीच्या खर्चाचे विश्लेषण करण्यासाठी आणि बजेट तयार करण्याचे काम CMA चे असते. संस्थांना फसवणूक आणि त्रुटींपासून संरक्षित करण्यात CMA मदत करतात.

4. व्यवसाय

कॉमर्स शाखेचे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकतात. अनेक असे व्यवसाय आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून ते चांगला नफा कमवू शकतात. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी ते स्वतःचा वापर करू शकतात. व्यवसायासाठी असलेल्या कामगारांचा पगार आणि कामाचे वातावरण नियंत्रित करण्याचे काम ते स्वतः करू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office