IDBI Bank : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे, सध्या मुंबईतील IDBI बँक अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
IDBI बँक अंतर्गत “मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या जागेसाठी पद्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 60 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज rec.experts@idbi.co.in या ईमेलद्वारे सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.idbibank.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
-अर्जासह आवशक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.