ECHS Bharti 2024 : ECHS मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, बघा पात्रता…

Content Team
Published:
ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024 : जर तुम्ही मुबंईत स्थित आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर, नर्सिंग असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्यून, सफाईवाला, चौकीदार” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

मेडिकल स्पेशालिस्ट : पीजीनंतर संबंधित स्पेशालिस्ट / डीएनबीमध्ये एमडी/एमएस विषयामध्ये किमान 05 वर्षे

डेंटल ऑफिसर : बीडीसी, इंटर्नशीपनंतर किमान ०५ वर्षांचा अनुभव, बीडीएस / पीजी/ अतिरिक्त पात्रतेमध्ये गुणवत्तेमध्ये प्राधान्य

नर्सिंग असिस्टंट : बीएससी नर्सिंग / जीएनएम डिप्लोमा/ क्लास। नर्सिंग असिस्टंट कोर्स (आर्ल्ड फोर्सेस) किमान 05 वर्षे अनुभव

डेटा एन्ट्री ऑपरेटर : पदवीधर/ क्लास । क्लेरिकल ट्रेड, (आर्ड फोर्सेस), किमान 05 वर्षे अनुभव

प्यून : वर्ग 8 किंवा किमान 5 वर्षांच्या कामाच्या अनुभवासह आर्ड फोर्सेससाठी जीडी ट्रेड

सफाईवाला : किमान 5 वर्षांच्या कामाच्या अनुभवासह साक्षर

चौकीदार : इयत्ता 8 वी किंवा कॉम्प्युटरच्या किमान ज्ञानासह आर्ड फोर्सेस पर्सोनेलकरिता जीडी ट्रेड

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज ओ आय/सी स्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०००८८ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 18 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-लक्षात घ्या अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe