जॉब्स

Education Tips: कमीत कमी खर्चात कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घ्यायचे असेल तर करा ‘या’ देशांची निवड! वाचतील लाखो रुपये

Published by
Ajay Patil

Education Tips:- उच्च शिक्षण घेणे हे आर्थिकदृष्ट्या प्रत्येकालाच परवडेल असे नाही. इंजीनियरिंग असो किंवा वैद्यकीय क्षेत्र किंवा कम्प्युटर सायन्स असो यामध्ये शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे इच्छा असून देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही.

याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक स्कॉलरशिप योजना राबवल्या जातात व अशा स्कॉलरशिप योजनांचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी विदेशात जाऊन देखील उच्च शिक्षण घेतात.

तसे पाहायला गेले तर भारतातील उच्च शिक्षण हे महागडे असे समजले जाते व त्या दृष्टिकोनातून  जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत की त्या देशांमध्ये अनेक प्रकारचे उच्च शिक्षणाचा खर्च हा भारताच्या तुलनेत कमीत कमी येतो.

उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर कॉम्प्युटर सायन्स अर्थात सीएस मधील शिक्षण बघितले तर विद्यार्थ्यांचा हा खूप आवडीचा विषय आहे. त्यामुळे कॉम्प्युटर सायन्स जर विदेशात जाऊन करायची इच्छा असेल तर प्रामुख्याने कॅनडा,जर्मनी, युके, ऑस्ट्रेलिया आणि युएसए सारख्या देशांची निवड फायद्याची ठरू शकते.

या ठिकाणी संशोधनासाठी देखील खूप मोठ्या संधी विद्यार्थ्यांना मिळतात. प्रोफेशनल्सना इंटरनॅशनल नेटवर्कचा लाभ देखील मिळतो व अशा अनेक प्रोग्राम्समुळे विद्यार्थ्यांना लेखी आणि प्रात्यक्षिक म्हणजेच थेरी व प्रॅक्टिकल चा अनुभव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेता येतो. या सगळ्या गोष्टींचा फायदा करिअरमध्ये विद्यार्थ्यांना होत असतो.

 कम्प्युटर सायन्सच्या शिक्षणासाठी करावी या देशांची निवड

1- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मधील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न इत्यादी ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सशी संबंधित खूप चांगले कोर्सेस उपलब्ध आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये पोस्ट स्टडी वर्क व्हीजा मिळतो व या व्हीजाच्या मदतीने विद्यार्थी त्या ठिकाणी दोन वर्षापर्यंत शिक्षण घेऊन काम देखील करू शकतात व कम्प्युटर सायन्सशी संबंधित कामाचा अनुभव मिळवू शकतात.

2- अमेरिका कॉम्प्युटर सायन्स मधील उत्तम शिक्षणाकरिता अमेरिका हा देश एक चांगला पर्याय आहे. अमेरिकेमधील एमआयटी, स्टॅनफोर्ड मधील एआय विद्यापीठ यांना अमेरिकेमधील टॉप युनिव्हर्सिटी समजल्या जातात. या युनिव्हर्सिटी मध्ये डेटा सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकवले जाते.

3- जर्मनी जर्मनीमध्ये TUM आणि RWTH Aachen सारख्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये कमीत कमी शुल्कामध्ये कम्प्युटर सायन्स शिकवले जाते.

इतकेच  नाहीतर तुम्हाला जर्मनीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी देखील त्याच ठिकाणी उपलब्ध होतात. जर्मनीमध्ये 18 महिन्यांचा पोस्ट स्टडी वर्क व्हीजा मिळतो व तो विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा ठरतो.

4- कॅनडा अमेरिकेपेक्षा कॅनडामध्ये कॅम्पुटर सायन्ससाठी कमी शुल्क लागते. कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो, यूबीसी व वाटरलुम सारख्या टॉप युनिव्हर्सिटी मध्ये कम्प्युटर सायन्सचे चांगले प्रोग्राम उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे कॅनडामध्ये सध्या टेक्नॉलॉजी सेक्टरची वाढ अतिशय गतीने होत असल्याने  विद्यार्थ्यांसाठी त्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी देखील मिळू शकतात. तसेच कॅनडामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिट विद्यार्थ्यांना तीन वर्षापर्यंत कॅनडात काम करण्याची परवानगी देते.

5- युके युकेमध्ये इंडस्ट्री कनेक्शनचा फायदा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मिळतो. या ठिकाणी केंब्रिज तसेच ऑक्सफर्ड आणि इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडन या महत्त्वाच्या यूनिवर्सिटीचा संपूर्ण फोकस सध्या मशीन लर्निंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी अशा क्षेत्रांवर आहे. या सगळ्यामुळे त्या ठिकाणी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम करण्याची दोन वर्ष परवानगी दिली जाते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil