ESIS Thane Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, गट अ” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता M.B.B.S अशी आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती ठाण्यात होत आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज महाराष्ट्र राज्य विमा सोसायटी, रा. का. वि. यो. रुग्णालय, ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे- ४०० ६०४ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज amoesisthanc@gmail.com या ई-मेलवर सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 29 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.esic.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन अशा (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.