Malad Sahkari Bank : 50 टक्के गुणांसह पदवीधर असाल तरीही बँकेत मिळेल नोकरी, फक्त करा ‘हे’ काम!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Malad Sahkari Bank Bharti 2024 : जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर मालाड सहकारी बँक लि अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे थेट सादर करा.

वरील भरती अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारी 10 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या जागेसाठी पदवीधर किंवा पदव्युत्तर 50 टक्के गुणांसह पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

इच्छुक उमेदवारांनी लक्षात घ्या नोकरीचे ठिकाण मालाड, मुंबई असे असेल.

वयोमर्यादा

या पदासाठी वयोमर्यादा 20 ते 26 वर्ष इतकी असेल यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य असतील. उमेदवारांसाठी हे शुल्क 750/- रुपये इतके असेल.

अर्ज पद्धती

या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास उमेदवार www.maladbank.com ला भेट देऊ शकतात.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.maladbank.com/ या लिंकद्वारे सादर करायचा आहे. तसेच अर्जासह शुल्क भरणे देखील आवश्यक आहे, जे उमेदवार अर्ज फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची 10 एप्रिल 2024 असून उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे. तसेच अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.