GAD Mumbai Bharti 2024 : मुंबई GAD अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु, येथे पाठवा अर्ज !

Content Team
Published:
GAD Mumbai Bharti 2024

GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत.

सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत “सदस्य (न्यायाधीश/प्रशासकीय)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदासाठी राज्य शासनाच्या सेवेतील कक्ष अधिकारी/अवर सचिव पदावरुन सेवानिवृत्त झालेला अधिकारी अर्ज करण्यास पात्र असेल. यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी असेल, यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

या भरतीसाठी अर्ज कक्ष अधिकारी कार्यासन-३८, ३ रा मजला, मुख्य इमारत, सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु गौक, मंत्रालय, मुंबई-३२. येथे पोस्टाने पाठवायचे आहेत, तर पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe