BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा…
बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील जागांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पद्धती
या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज शुल्क
यासाठी अर्ज शुल्क देखील आहेत, खुला प्रवर्गाकरीता 1000/- (सर्व करासहित) तर मागासप्रवर्गाकरीता 900/- (सर्व करासहित) असे शुल्क आकाराने जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज १७ मे २०२४ पर्यंत सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/bmclijan24/ या लिंकद्वारे अर्ज सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जासह अर्जशुल्क भरणे देखील आवश्यक आहे.
-परीक्षा शुल्क भरण्याकरीता ऑनलाईन सुविधा (ONLINE MODE) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
-लक्षात घ्या सदर परीक्षा शुल्क हे ना-परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
-या भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ असून, उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात एकदा सविस्तर वाचावी.