KRCL Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव), सीएडी/ ड्राफ्ट्समन, सहायक अभियंता” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 रोजी हजर राहायचे आहे. (पदांनुसार)
शैक्षणिक पात्रता
Graduation in Civil Engineering
नोकरी ठिकाण
ही भरती नवी मुंबईत होत आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे. (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास या https://konkanrailway.com/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-अर्जासह वरील पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 आहे.
-अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-मुलाखतीस येताना भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
महत्वाचे कागदपत्र
-पात्रतेच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्राच्या प्रती
-जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत (SSLC/SSC प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र)
-माजी सैनिकांसाठी दाव्यांच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र, जर असेल तर.
-दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो.
-व्यावसायिक अनुभव, अंतिम सेवा आणि इतर संबंधित कागदपत्रांची प्रत इत्यादी…