KRCL Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता (निविदा व प्रस्ताव), सीएडी/ ड्राफ्ट्समन, सहायक अभियंता” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 रोजी हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करणाया पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती नवी मुंबई येथे होत आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
यासाठी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 आहे. (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://konkanrailway.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 15, 20, 24, 25 आणि 27 जून 2024 आहे. (पदांनुसार)
-अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
आवश्यक कागदपत्रे :-
-पात्रतेच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्राच्या प्रती
-जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत
-माजी सैनिकांसाठी दाव्यांच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र, जर असेल तर.
-दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो.
-व्यावसायिक अनुभव, अंतिम सेवा आणि इतर संबंधित कागदपत्रांची प्रत.
-राजपत्रित अधिकारी/कार्यकारी अधिकारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्र चांगले नैतिक चारित्र्य धारण करणे.
-शिफारस केलेले दस्तऐवज
-पूर्वीच्या तसेच वर्तमान नियोक्त्याने जारी केलेल्या रोजगार पत्राची प्रत.
-मागील/वर्तमान नियोक्त्याने जारी केलेल्या फॉर्म 16 ची प्रत.
-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) क्रमांक/PF क्रमांक दर्शविणाऱ्या दस्तऐवजाची प्रत