SBI Recruitment 2025:-आजकाल विविध भरती परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असून यामध्ये स्पर्धा परीक्षांपासून तर बँकिंग सेक्टरच्या परीक्षांची तयारी अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जाते. यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध असल्याने या परीक्षांची तयारी देखील अनेक विद्यार्थी करत असतात.
अगदी याच प्रकारे तुम्ही देखील बँकेच्या विविध परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली असून ही भरती स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांसाठी राबवण्यात येणार असून याकरिता आता अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे.
यामुळे जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये क्षेत्रिय प्रमुख व इतर तत्सम पदे देखील भरली जाणार आहेत.
एसबीआयच्या माध्यमातून होणार 150 रिक्त जागांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे व याकरिता अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
या भरती प्रक्रियेतून जवळपास 150 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीची नोंदणी प्रक्रिया 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 आहे.
काय आहे पात्रता?
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे उमेदवारांनी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी( कोणत्याही विषयातील) पूर्ण केलेली असावी आणि त्यासोबत IIBF द्वारे फॉरेक्स मधील प्रमाणपत्र( प्रमाणपत्र तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत नवीनतम असावी.)
कशी केली जाईल निवड?
निवड प्रक्रिया जर बघितली तर यामध्ये शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. मुलाखतीला शंभर गुण असणार आहेत व मुलाखतीतील पात्रता गुण हे बँकेच्या माध्यमातून ठरवले जातील.
अंतिम निवडीसाठी मेरिट लिस्ट केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाणार आहे. समजा यामध्ये जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट ऑफ गुण मिळवले तर अशा उमेदवारांना गुणवत्तेनुसार रँक केले जाईल.
किती आहे अर्जासाठीचे शुल्क?
या भरती करिता सामान्य/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क 750 आहे. तसेच एसटी/ एसी/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क/ सूचना शुल्काचा समावेश नाही.
ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरून पेमेंट केले जाऊ शकते.
अशा पद्धतीने करावा अर्ज
1- या भरती करिता अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर एसबीआयचे अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्यावी.
2- त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर करियर्स वर जावे आणि करंट ओपनिंग वर क्लिक करावे.
3- या ठिकाणी असलेल्या या भरती संबंधित अर्ज लिंक वर क्लिक करावे.
4- त्यानंतर उमेदवारांनी क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे आणि आवश्यक तपशील नमूद करावा.
5- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तपशील तसेच फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करता येते.
6- शेवटी अर्ज शुल्क भरावे आणि पूर्ण भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी आणि ती सुरक्षित ठेवावी.