Railway Loco Pilot Recruitment:- सध्या शासनाच्या विविध विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू असून काही नवीन भरती प्रक्रियांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबतच संरक्षण क्षेत्र किंवा बँकेत देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
याच पद्धतीने आता भारतीय रेल्वे विभागांमध्ये देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून जे विद्यार्थी किंवा उमेदवार रेल्वे भरती परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्याकरिता रेल्वेच्या माध्यमातून नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आलेले आहेत.
सध्या जर आपण रेल्वे भरतीचा विचार केला तर भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणारा असून त्यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. याकरिता इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटसाठी भरती
1- पदाचे नाव व रिक्त जागा– भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणारी ही भरती असिस्टंट लोको पायलट या पदासाठी घेण्यात येणार आहे व या पदाच्या तब्बल 5,696 पदे रिक्त आहेत.
2- लागणारी वयोमर्यादा– या भरतीसाठी जे उमेदवार पात्र व इच्छुक असतील त्या उमेदवारांचे वय हे किमान 18 ते कमाल तीस वर्षे असणे गरजेचे आहे.
3- अर्ज करण्याची पद्धत– असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेण्यात येणाऱ्या या भरती करिता पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
4- शैक्षणिक पात्रता– रेल्वे विभागाच्या माध्यमातून एकूण पाच हजार 96 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही दहावी तसेच आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
5- किती मिळेल वेतन?- या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना 19 हजार 900 रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.
6- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक– असिस्टंट लोको पायलट पदासाठी जे पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
1- महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
2- अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी महत्त्वाची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
3- अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
4- यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. या मुदतीनंतर आलेले अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी या ठिकाणी साधा संपर्क
https://indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क साधू शकता.