तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल व त्यातल्या त्यात तुम्हाला जर भारतीय संरक्षण विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय नौदलाच्या माध्यमातून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना एक सुवर्णंसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे
व त्या माध्यमातून जर आपण बघितले तर भारतीय नौदलाच्या माध्यमातून एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इतकेच नाही तर भारतीय नौदलाच्या माध्यमातून या भरतीसाठी आवश्यक अधिसूचना जारी करण्यात आलेली असून याकरिता इच्छुक व पात्र उमेदवार आजपासून म्हणजे 7 सप्टेंबर 2024 पासून यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
भारतीय नौदलात बारावी पास तरुणांना सुवर्णसंधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय नौदलाच्या माध्यमातून एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे व यासंबंधीची अधिसूचना नौदलाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असतील त्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार असून ही अर्ज करण्याची प्रक्रिया 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना भारतीय नौदलाच्या माध्यमातून 29 ऑगस्ट 2024 रोजी जारी करण्यात आलेली होती व आता ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
कोणत्या पदासाठी होत आहे ही भरती आणि काय आहे शैक्षणिक पात्रता?
भारतीय नौदलाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदासाठी घेण्यात येत आहे. या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पाहिली तर अर्ज करणारा उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 इंटरमीडिएटची परीक्षा(फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व यात कमीत कमी 50 टक्के गुण असावेत.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
भारतीय नौदलाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्या उमेदवारांची जन्मतारीख ही एक नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या कालावधीत असणे गरजेचे आहे.
किती लागेल अर्ज करण्यासाठी शुल्क?
भारतीय नौदलाच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या एसएसआर मेडिकल असिस्टंट पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
निवड झाल्यानंतर किती मिळेल वेतन?
भारतीय नौदलाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये या उमेदवारांची निवड होईल त्यांना 21 हजार 700 रुपये येथे 69 हजार 100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही चार टप्प्यात केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे व ही परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागेल.
शारीरिक चाचणी पास झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल व हे चार टप्पे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची शेवटी मेरिट लिस्ट लावली जाईल व या मेरिट लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचे नाव असेल त्यांना लवकरच नियुक्ती पत्र दिले जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय नौदलाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या एसएसआर मेडिकल असिस्टंट पदासाठी ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते 17 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत करू शकतात.