जॉब्स

भारतीय हवाई दलामध्ये पायलट होण्याचे स्वप्न आहे का? होत आहे 304 रिक्त पदांसाठी भरती! अशा पद्धतीने करा अर्ज

Published by
Ajay Patil

बऱ्याच तरुण-तरुणींची भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची अगदी लहानपणापासून इच्छा असते व त्या दृष्टिकोनातून असे विद्यार्थी अगदी लहानपणापासून तयारी करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये आर्मी, सीआरपीएफ तसेच बीएसएफ व यासोबतच नेव्ही व हवाई दल अर्थात एअर फोर्समध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते.

त्यातल्या त्यात एअरपोर्टच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये पायलट होणे हे कित्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते व अगदी याच प्रमाणे तुमचे देखील एअर फोर्स मध्ये पायलट होण्याचे स्वप्न असेल तर भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून आता ही संधी चालून आलेली आहे. हवाई दलाच्या माध्यमातून एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट अर्थात AFCAT साठी जाहिरात काढले असून या माध्यमातून फ्लाईंग ब्रांच आणि ग्राउंड ड्युटी शाखेतील तब्बल 304 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

 एअर फोर्स कॉमन ऍडमिनेशन टेस्ट अर्थात एएफसीएटी साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

या अंतर्गत फ्लाईंग ब्रांच या पदासाठी भरती होणार आहे व या पदासाठी अर्जदार हा किमान 50 टक्के गुणासह बारावी सायन्स शाखेतून( गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व यासोबतच बीटेक/बीई मध्ये 60 टक्के गुण आवश्यक आहेत.

 ग्राउंड ड्युटी( तांत्रिक ) शाखेकरिता किमान बारावी विज्ञान शाखेत( गणित व भौतिकशास्त्र) 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व बीई/ बीटेक इत्यादीमध्ये 60% गुणांचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 ग्राउंड ड्युटी( नॉन टेक्निकल) या पदाकरिता बारावी विज्ञान शाखेत( गणित व भौतिकशास्त्र) 50% गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे असून 60% गुणांसह कोणत्याही शाखेमधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे गरजेचे आहे.

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

जे उमेदवार फ्लाईंग ब्रांच या पदासाठी अर्ज करतील अशा उमेदवारांचे वय 24 ते 24 वर्ष दरम्यान असावे आणि ग्राउंड ड्युटी शाखेकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 26 वर्षाच्या दरम्यान असावे.

 या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

यामध्ये भारतीय हवाई दल AFCAT 2024 साठी निवड प्रक्रिया करताना लेखी परीक्षा, हवाई दल निवड मंडळाची मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी इत्यादी टप्पे पार करणे गरजेचे आहे. यामध्ये एएफसीएटी लेखी परीक्षा तीनशे गुणांचे असते

व दोन तास चालणाऱ्या या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारलेले असतात. एका प्रश्नासाठी तीन मार्क मिळतात व निगेटिव्ह मार्किंग असते हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरांकरिता एक गुण मायनस केला जातो.

 या भरतीसाठी अर्ज कसा कराल?

1- यासाठी उमेदवाराला सगळ्यात अगोदर afcat.cdac.in या एएफसीएटीच्या वेबसाईटवर जावे लागेल.

2- त्या ठिकाणी गेल्यानंतर मेन पेजवर दिसणाऱ्या IAF AFCAT 2 2024 लिंक वर क्लिक करावे लागेल.

3- त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होतो व त्यामध्ये विचारलेले आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे.

4- माहिती भरून झाल्यानंतर पूर्ण अर्ज व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून व तपासून घ्यावा.

5- त्यानंतर अर्जाची फी भरावी आणि सबमिट लिंकवर क्लिक करावे व त्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नये.

 अर्ज भरण्याच्या तारखा

भारतीय हवाई दलाअंतर्गत फ्लाईंग ब्रांच आणि ग्राउंड ड्युटी शाखेतील 304 रिक्त पदांसाठी जी भरती केली जाणार आहे त्यासाठी 30 मे 2024 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जून 2024 आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil