जॉब्स

Recruitment News: 10 वी पास उमेदवारांना HAL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; मिळेल बंपर पगार,वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Recruitment News:- सध्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. तसेच अनेक बँकांच्या माध्यमातून देखील आता भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून या होऊ घातलेल्या भरतीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उपलब्ध झालेल्या या संधीचे सोने करण्याची गरज आहे.

नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात देखील पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या सुरू असून मोठ्या प्रमाणावर या भरतीसाठी अर्ज करण्यात आलेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या माध्यमातून देखील आता दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी चालून आली असून या ठिकाणी ऑपरेटर पदाच्या रिक्त जागांकरिता भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.

HAL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल च्या माध्यमातून ऑपरेटर या पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. साधारणपणे एकूण 58 रिक्त पदांकरिता ही भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे व याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 30 जून 2024 पर्यंत अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. उमेदवार हे  hal-india.co.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकणार आहेत.

 पदनिहाय एकूण रिक्त जागांचा तपशील

1- ऑपरेटर( सिविल)- या पदाच्या एकूण रिक्त जागा दोन आहेत.

2- ऑपरेटर( इलेक्ट्रिकल)- या पदासाठीच्या एकूण रिक्त जागा 14 आहेत.

3- ऑपरेटर( इलेक्ट्रॉनिक्स)– या पदाच्या एकूण रिक्त जागा सहा आहेत.

4- ऑपरेटर( मेकॅनिकल)- या पदाच्या एकूण रिक्त जागा सहा आहेत.

5- ऑपरेटर( फिटर)- या पदाच्या एकूण रिक्त जागा 26 आहेत.

6- ऑपरेटर( इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)- या पदाच्या एकूण रिक्त जागा चार आहे.

 आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेमध्ये ऑपरेटर( सिविल), ऑपरेटर (इलेक्ट्रिकल), ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स) आणि ऑपरेटर मेकॅनिकल या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून या सोबतच सिविल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल यापैकी कोणत्याही डिप्लोमा कोर्समध्ये 60% मार्क सह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

महत्वाचे म्हणजे एससी/ एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवार 50 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यासोबतच ऑपरेटर( फिटर) आणि ऑपरेटर( इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व त्यासोबतच फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या आयटीआय संबंधित डिप्लोमा कोर्समध्ये 60% उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. एससी तसेच एसटी व पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवार पन्नास टक्क्यांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

एचएएलमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही 25 मे 2024 पर्यंत ११ ते २८ वर्षांपर्यंत असावी. तसेच एसटी व एससी प्रवर्गातील उमेदवारांना वयात पाच वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयात तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

अर्ज करताना कुठलेही शुल्क उमेदवारांकडून घेतले जाणार नाही.

 निवड झाल्यानंतर कुठे करावी लागेल नोकरी?

हिंदुस्तानी एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नाशिक या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल.

 काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

या भरती प्रक्रियेसाठी ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते 30 जून 2024 पर्यंत करू शकतात.

 लेखी परीक्षा कधी होईल?

एचएएलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा 14 जुलै 2024 रोजी होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil