Categories: जॉब्स

IDBI Bank Recruitment 2024: आयडीबीआय बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! वाचा पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती

Published by
Ajay Patil

IDBI Bank Recruitment 2024:- सध्या अनेक शासकीय विभागातर्गत सध्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यासाठीच्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन देखील त्या त्या विभागाकडून जारी करण्यात येत आहेत.

त्यामुळे विविध परीक्षांच्या तयारी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींकरिता नोकरीची ही सुवर्ण संधीचा हा काळ आहे असेच म्हणावे लागेल. तसेच अनेक विद्यार्थी हे बँकेच्या विविध परीक्षांची तयारी करत असतात.

अशा विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक बँकांच्या माध्यमातून सध्या विविध पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अगदी याचा अनुषंगाने जर आपण बँकेतील रिक्त पदांच्या भरतीचा विचार केला तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात

आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदांच्या तब्बल 500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या तरुण-तरुणींकरिता ही एक सुवर्णसंधी आहे असेच म्हणावे लागेल.

 आयडीबीआय बँकेत 500 जागांसाठी होणार भरती

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून उमेदवारांकरिता भरतीचे अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे व ही भरती ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर या पदांच्या रिक्त जागांसाठी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवार https://www.idbibank.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

 आयडीबीआय बँकेतील भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

 आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून होऊ घातलेले या भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 25 वर्षे या दरम्यान असावे.

 आयडीबीआय बँकेतील या भरती करीता आवश्यक शैक्षणिक पात्रता

 यामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे.

 या भरती अंतर्गत कशी केली जाईल उमेदवारांची निवड?

 या भरतीमध्ये उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने चाचणी घेतली जाणार आहे व या चाचणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील अशा पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल व त्यानंतर ऑनलाईन परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे.

 या भरतीसाठी अर्ज करण्याकरता किती शुल्क लागेल?

 या भरती करिता जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील त्यांना अर्ज शुल्क लागणार असून यामध्ये एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी दोनशे रुपये इतके अर्ज शुल्क लागणार आहे. तर इतर वर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

 कसा करावा अर्ज?

 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून याकरिता आयडीबीआय बँकेचे अधिकृत वेबसाईट https://www.idbibank.in वर तुम्हाला जावे लागेल. त्यानंतर होम पेजवर जावे आणि करियर या लिंकवर क्लिक करणे गरजेचे आहे.

या ठिकाणी क्लिक केल्यावर पुढे करंट ओपनिंग वर क्लिक करावे. JAM 2024 भरती टॅब अंतर्गत अर्ज लिंक वर क्लिक करावे व नोंदणी करून घ्यावी.

त्यानंतर आवश्यक अर्ज प्रक्रियेसोबत पुढे जावे. अर्जाचा फॉर्म भरावा व अर्जाचे शुल्क त्या ठिकाणी भरावे व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी व अर्ज सबमिट करावा. तुमच्या संदर्भा करिता त्या फॉर्मची एक प्रिंट आऊट घेऊन ठेवणे फायद्याचे ठरेल.

 अर्ज करण्याची सुरू आणि अंतिम तारीख

 आयडीबीआय बँक अंतर्गत घेण्यात येत असलेल्या या भरतीकरता अर्ज प्रक्रिया ही 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे व अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil