DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे जाणून घेऊया…
वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहाय्यक” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे. लक्षात घ्या दिलेल्या तारखे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी B.E./ B.Tech/ M.Sc उमेदवारांना संधी मिळेल.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी vijayhiwarkar@diat.ac.in या ईमेलवर अर्ज पाठवा.
ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी mjnene@diat.ac.in या ईमेलवर अर्ज पाठवा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
02 मे 2024
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पदांनुसार अर्ज पाठवायचे आहेत.
-अर्ज पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने देखील महत्वाचे आहे.
-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.