Tata Memorial Centre Bharti : TMC अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी; वाचा संपूर्ण माहिती

Content Team
Published:
Tata Memorial Centre Bharti

Tata Memorial Centre Bharti : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागांची भरती निघाली आहे पाहूया…

वरील भरती अंतर्गत “मेडिकल फिजिसिस्ट, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, महिला नर्स ‘ए’, टेक्निशियन ‘सी’ (ICU/OT)” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

या भरती साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

भरती भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 असून उमेदवारांनी संबंधित तारखे अगोदर आपले अर्ज पाठवावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe