जॉब्स

पदवीधरांनो मुंबई महानगरपालिकेत नोकरी कारायचीये? अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

Published by
Renuka Pawar

BMC Licence Inspector Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका परवाना निरीक्षक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गाकरीता 1000/- रुपये मागासप्रवर्गाकरीता 900/- रुपये इतके शुल्क आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2024 पासून सुरु होईल तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://portal.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/bmclijan24/ या लिंकद्वारे सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि मगच आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज 17 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी जाहिरात सविस्तर वाचा.

 PDF जाहिरात

 PDF शुद्धिपत्रक

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar