BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, चला या भरती बद्दल सविस्तर जाणून घेऊया…
वरील भरती अंतर्गत “साहाय्यक प्राध्यापक संवर्गाची” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज बा. य. ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 03 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 असून, देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.