NIN Bharti 2024 : पुण्यात सध्या राष्ट्रीय पोषण संस्थामध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर जाणून घ्या या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत. तसेच यासाठी उमेदवारांची निवड कशी होणार आहे.
वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (E&M), ऑडिओ-व्हिडिओ ऑपरेटर, HVAC सेवा ऑपरेटर, सीवरेज व्यवस्थापन व्यक्ती, मीडिया सल्लागार, आयटी सल्लागार आणि डोमेन तज्ञ” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 27 मे आणि 03 जून 2024 रोजी (पदांनुसार) संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, बापू भवन, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे-411001. या पत्त्यावर आयोजित करण्यात येत आहे.
मुलाखतीची तारीख
वरील भरतीसाठी मुलाखत 27 मे आणि 03 जून 2024 रोजी घेण्यात येईल. (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ninpune.ayush.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-सदर पदांकरिता मुलाखत 27 मे आणि 03 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.