ISRO Bharti 2023 : जर तुम्ही दहावी पास असाल पण सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास उमेदवारांना इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार इस्रो विविध पदाच्या तब्बल 35 रिक्त जागा भरणार आहे. दरम्यान आज आपण इस्रोने जारी केलेल्या या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
इस्रोने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन या दोन पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
इस्रोच्या माध्यमातून तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन या पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यात तंत्रज्ञ पदाच्या 34 जागा राहणार आहेत आणि ड्राफ्ट्समन पदाची एक जागा राहणार आहे.
आवश्यक शैक्षणिक अहर्ता
तंत्रज्ञ या पदासाठी दहावी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. ड्राफ्ट्समन या पदासाठी दहावी पास आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत.
वयोमर्यादा
या पदासाठी 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
किती वेतन मिळणार बरं
मिळालेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञ या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69,100 प्रति महिना एवढं वेतन दिले जाणार आहे. तसेच ड्राफ्ट्समन या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये प्रति महिना एवढे वेतन दिले जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://careers.sac.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना आपला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. https://www.isro.gov.in/ ही इस्रोची अधिकृत वेबसाईट असून या वेबसाईटवर जाऊन देखील याबाबत माहिती मिळवता येऊ शकणार आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
https://www.isro.gov.in/media_isro/pdf/recruitmentNotice/2023_August/ADVT_SAC_03_2023_01Aug2023.pdf
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 21 ऑगस्ट 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे.