KRCL Bharti 2024 : तुम्हीही पदवीधर असाल तर मुंबई रेल्वेत मिळेल नोकरी, ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित…

Content Team
Published:
KRCL Bharti 2024

KRCL Bharti 2024 : पदवीधारक उमेदवारांना रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी चालून आली आहे, सध्या कोकण रेल्वे अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 

वरील भरती अंतर्गत “AEE/करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल, डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 रोजी पदांनुसार हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

ही भरती नवी मुंबई येथे सुरु आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., जवळ सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई या पत्त्यावर आयोजित केली जात आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख पदांनुसार 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 रोजी आयोजित केली जाईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://konkanrailway.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रकिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

-उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

-मुलाखतीची तारीख 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 (पदांनुसार) आहे.

-मुलाखतीस येताना सोबत अर्ज व कागदपत्रे आणावीत.

-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe