Master Course In India:- प्रत्येक विद्यार्थी किंवा पालक हे कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी त्या अभ्यासक्रमाला असलेला नोकरीच्या दृष्टिकोनातून स्कोप आणि मिळणारा पगार इत्यादी दृष्टिकोनातून विचार करत असतात. कारण तुम्ही कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे.
कारण हे करिअरच्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत संपूर्ण आयुष्याशी निगडित असलेला हा निर्णय असल्यामुळे त्याला खूप महत्त्व देखील असते. त्यामुळे कुठल्याही अभ्यासक्रम निवडण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण विचार करूनच निवड करणे गरजेचे असते. अशाच प्रकारे तुम्हाला जर मास्टर कोर्स अर्थात पदव्युत्तर पदवी करायची असेल तर त्याची निवड करण्या अगोदर तुम्हाला तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी मिळतील का?
करिअरच्या दृष्टिकोनातून तुमची प्रगती होईल की नाही किंवा तुम्हाला चांगला पगार या माध्यमातून मिळेल का? या गोष्टींचा देखील विचार करणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे जर आपण काही पदव्युत्तर अभ्यासक्रम जर बघितले तर त्यामध्ये तुम्हाला पगार तर लाखात मिळू शकतो. परंतु चांगला अभ्यास केला तर मोठमोठ्या ठिकाणी देखील तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यामुळे या लेखामध्ये अशाच काही महत्त्वाच्या मास्टर कोर्सबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू.
लाखोत पगार मिळवण्याची संधी देतील हे मास्टर्स कोर्स
1- मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए- एमबीए ही सर्वात उत्कृष्ट अशी पदव्युत्तर पदवी असून याचा अभ्यास केल्यावर तुम्हाला चांगली नोकरी तर मिळतेच.
परंतु अनेक उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी देखील मिळतात. एमबीए केल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर तसेच डायरेक्टर, सीईओ तसेच बोर्ड मेंबर आणि अगदी उद्योजक अशा अनेक प्रकारच्या करिअरचे मार्ग तुम्हाला यामध्ये उपलब्ध होतात.
2- मास्टर ऑफ सायन्स इन नर्सिंग- तुम्हाला जर आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी नर्सिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्सचा कोर्स खूप फायद्याचा ठरू शकतो.
हा अभ्यासक्रम जर तुम्ही अमेरिकेत शिकलात तर त्या ठिकाणी तुम्हाला लाखो रुपये पगाराची नोकरी मिळेल. परंतु याकरिता तुम्हाला अगोदर नर्सिंगमध्ये पदवी मिळवावी लागते आणि त्यानंतर राज्य परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. तरच तुम्हाला नर्सिंग मध्ये मास्टर ऑफ सायन्स करता येते.
3- मास्टर इन इकॉनॉमिक्स/ फायनान्स- अर्थशास्त्र किंवा वित्तीय विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन सल्लागार तसेच अर्थतज्ञ, लेखापरीक्षक आणि बँकर म्हणून सहज नोकऱ्या मिळतात.
एक वरिष्ठ बँकर म्हणून तुम्हाला जर अमेरिकेसारख्या देशांमध्ये नोकरी मिळाली तर तुम्हाला त्या ठिकाणी 1.34 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो.
4- मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स- कम्प्युटर किंवा संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यास नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. तुम्ही वरिष्ठ सॉफ्टवेअर किंवा वेब डेव्हलपर,
सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट तसेच बिझनेस इंटेलिजन्स आणि कॉम्प्युटर फॉरेन्सीक्स यासारख्या भूमिकांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. अमेरिकेसारख्या देशांमध्ये या क्षेत्रात येणाऱ्या काळात लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.