IRCTC Bharti 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत उमेदरांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे.
वरील भरती अंतर्गत “आदरातिथ्य मॉनिटर्स” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 03 आणि 05 जुलै 2024 रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहावे.
शैक्षणिक पात्रता
BBA/MBA /B.Sc झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028 या पत्त्यावर घेण्यात येईल.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 03 आणि 05 जुलै 2024अशी आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.irctc.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-लक्षात घ्या केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
-सदर पदांकरिता मुलाखती 03 आणि 05 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.