MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरतीअंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापक : BE/B.Tech in Civil Engineering with First Class from recognized (AICTE) University.
उपमहाव्यवस्थापक : BE/B.Tech (Civil/Electrical/Electronics) with not less than 70% marks & Post Graduation in any engineering stream from recognized (AICTE) University.
सहायक व्यवस्थापक : BE/B.Tech (Civil/Electrical/Electronics) with not less than 60% marks from recognized (AICTE) University and minimum 5 years of post-qualification working experience in safety management of construction projects.
वयोमर्यादा
वरील पदांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
उमेदवारांनी अर्ज career@mrvc.gov.in या ई-मेलवर सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 07 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mrvc.indianrailways.gov.in/ ला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना एक लाखापेक्षा जास्त पगार मिळेल. लक्षात घ्या पदांनुसार वेतन वेगवेगळे असेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज वर दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे देखील महत्वाचे आहे,
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.