Education Tips:- भारतामध्ये उच्च शिक्षण घेणे हे जास्त महागडे आहे असे म्हटले जाते. तसे पाहायला गेले तर भारतापेक्षा इतर देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण देखील जास्त आहे.
कारण जगाच्या पाठीवरील बऱ्याच देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी भारतात लागणाऱ्या खर्चापेक्षा कमीत कमी खर्च लागतो व विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येते.
उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून भारतातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जर बघितले तर एमबीएसाठी देखील दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. एमबीए अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही शाखेत बॅचलर पदवी मिळवणे गरजेचे असते.
आज जर आपण ट्रेडिंग अभ्यासक्रम बघितले तर यामध्ये एमबीए चा समावेश होतो. देशातील सर्वोच्च आणि महत्त्वाची एमबीए इन्स्टिट्यूट बघितली तर ती आयआयएम असून या इन्स्टिट्यूटमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता CAT परीक्षा पास आऊट करणे गरजेचे असते.
एमबीए पासआऊट झाल्यानंतर विदेशामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. परंतु त्याकरिता योग्य ब्रांच अर्थात शाखेमध्ये एमबीए पूर्ण करणे आवश्यक असते.
अशा महत्त्वाच्या शाखेमध्ये एमबीए पूर्ण केले तर विद्यार्थ्यांना अनेक विदेशी कंपन्यांमध्ये करोडोच्या पॅकेजेच्या नोकऱ्या सहज मिळतात.त्यामुळे एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर नेमका तो कोणत्या शाखेमधून घ्यावा व जेणेकरून करोडोंचे पॅकेज तुम्हाला सहज मिळू शकेल? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू.
एमबीएच्या या शाखांमधील प्रवेश मिळवून देईल तुम्हाला परदेशात उच्च पगाराची नोकरी
1- एमबीए इन इंटरनॅशनल बिझनेस( आंतरराष्ट्रीय व्यवसाय)- ही शाखा जागतिक व्यवसाय आणि व्यापार समस्यांवर लक्ष केंद्रित करते व त्यासंबंधीचा अभ्यास यामध्ये असतो.
2- एमबीए इन फायनान्स– आर्थिक आणि वित्तीय सेवांमधील नोकऱ्यांसाठी ही शाखा सर्वात उत्तम अशी आहे.
3- एमबीए इन मार्केटिंग– जागतिक बाजारपेठेत मार्केटिंग विषयी म्हणजेच विपणन धोरणे जाणून घेण्यासाठी या शाखेचा उपयोग होतो.
4- एमबीए इन ऑपरेशन मॅनेजमेंट– जर तुम्हाला ग्लोबल सप्लाय चेन आणि लॉजिस्टिकच्या क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये एमबीए करू शकतात.
5- एमबीए इन ह्युमन रिसोर्स अर्थात एचआर– मानव संसाधन व्यवस्थापन विभागातील नोकरी मिळवायची असेल तर ह्युमन रिसोर्स ब्रांचमध्ये एमबीए करणे गरजेचे आहे.
6- एमबीए इन डिजिटल मार्केटिंग– डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील आणि ई-कॉमर्स मधील नोकरी मिळवायचे असेल तर डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए करणे गरजेचे आहे.
7- एमबीए इन ग्लोबल– या शाखेत एमबीए केल्यानंतर तुम्हाला जागतिक व्यवसाय आणि व्यवस्थापन स्तरावर उच्च पगाराची नोकरी मिळणे शक्य आहे.
8- एमबीए इन हेल्थकेअर मॅनेजमेंट– आरोग्य क्षेत्रातील संबंधित चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी हेल्थकेअर मॅनेजमेंट मधील एमबीए करणे गरजेचे आहे.
9- एमबीए इन टेक्निकल मॅनेजमेंट अर्थात तंत्रज्ञान व्यवस्थापन– तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनातील नोकऱ्यांसाठी टेक्निकल मॅनेजमेंट या ब्रांच मध्ये एमबीए करणे गरजेचे आहे.
10- एमबीए इन सस्टेनेबिलिटी– शाश्वत व्यवसाय आणि पर्यावरण संबंधी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सस्टेनेबिलिटी या शाखेत एमबीए करणे गरजेचे आहे.
विदेशात नोकरी मिळवायची तर या ठिकाणहून करा एमबीए
तुम्हाला जर परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करायचे असतील तर त्या ठिकाणाच्या इन्स्टिट्यूशनमध्ये एमबीए करणे फायद्याचे ठरेल.तुम्ही हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस,व्हार्टन स्कूल तसेच लंडन बिजनेस स्कूल, एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि केंब्रिज जज बिजनेस स्कूल सारख्या संस्थेतून एमबीए करणे फायद्याचे ठरेल.