Sahyadri Sahakari Bank : मुंबईतील दि सह्याद्री सहकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी वाचाच…

Content Team
Published:
Sahyadri Sahakari Bank

Sahyadri Sahakari Bank : बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा.

वरील भरती अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक अनुभवी, अनुपालन अधिकारी अनुभवी, कनिष्ठ व्यवस्थापक अनुभवी, अधिकारी (प्रशिक्षणार्थी) अनुभवास प्राधान्य” या पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

या जागांसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 50 वर्ष इतकी आहे, यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज पद्धती

या जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई 446, जेएसएस रोड, चिरा बाजार, मुंबई -400 002. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे, देय तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित सविस्तर माहिती https://www.thesahyadribank.com/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी अर्ज पाठवताना योग्य ती दक्षता घ्यावी, तसेच अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्ज अपूर्ण असल्यास तो नाकारला जाईल.

-अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe