IIPS Mumbai Bharti 2024 : IIPS मुंबई अंतर्गत सुरु आहे भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम असेल.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत “संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे विशिष्ट पदवी असणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी अर्ज संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज श्री अमृतलाल जांगीड, सहसंचालक (सांख्यिकी), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, कक्ष क्रमांक 317, 3 रा मजला, IRCS बिल्डिंग, रेड क्रॉस रोड, नवी दिल्ली – 110001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

असा करा अर्ज

-इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज संलग्नकांसह रीतसर भरलेला असावा.
-अर्ज योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारे कागदपत्रांशिवाय पाठवू नका. अन्यथा अर्ज नाकारले जातील.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.