IIIT Pune Bharti 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे ‘या’ पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIIT Pune Bharti 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी खूप चांगली आहे, यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, सहायक निबंधक, कनिष्ठ अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 असून, उमेदवारांनी या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, पण पदवीधर उमेदवारच येथे अर्ज करण्यास पात्र असतील, उमेदवारांनी पदांनुसार शैक्षणिक पात्रता तपासून आपले अर्ज सादर करावेत.

वरील भारतीसाठी अर्ज संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), पुणे सर्व्हे नं.९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, पुणे – ४१११०४१, महाराष्ट्र या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तरी अर्ज 18 मार्च 2024 च्या अगोदर सादर करावेत, भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.iiitp.ac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज दिलेल्या तारखे अगोदर पाठवायचे आहेत.

-अर्ज पाठवताना सोबत आवश्यक कदपत्रे देखील सादर करावीत. अर्जसोबत कदपत्रे नसतील तर अर्ज अपूर्ण मानला जाईल.

-वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे अगोदर म्हणजेच 18 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात 1 

PDF जाहिरात 2