जॉब्स

ISRO Recruitment 2024: इस्रो मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 02 लाखाहून अधिक पगार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published by
Aadil Bagwan

ISRO Recruitment 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही देशाची अभिमानाची संस्था आहे. येथे काम करणे म्हणजे देशाच्या अंतराळ कार्यक्रमात योगदान देणे होय. इस्रो नेहमीच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. तसेच या क्षेत्रात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तसेच या विभागात नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना दोन लाखाहून अधिक पगार मिळणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत ही भरती 103 पदांसाठी राबवली जात आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 9 ऑक्टोबर 2024 या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

ISRO Recruitment 2024 Details:

रिक्त पदे आणि तपशील:

या भरती अंतर्गत एकूण 103 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच या रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी – SD , वैज्ञानिक अभियंता- SC , तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ – B, ड्राफ्ट्समन – B आणि सहाय्यक (राजभाषा) इत्यादी पदांचा समावेश आहे, तसेच इस्त्रोच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

इस्रोच्या या भरतीसाठी वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे खालील प्रमाणे वयोमर्यादा पाहू शकता-

  • वैद्यकीय अधिकारी (SD): या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय अधिकारी (SC): या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • वैज्ञानिक अभियंता (SC): या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक सहाय्यक: या पदासाठी 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • वैज्ञानिक सहाय्यक: या पदासाठी 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे
  • तंत्रज्ञ (B): या पदासाठी 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे
  • ड्राफ्ट्समन (B): या पदासाठी 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे
  • सहाय्यक (राजभाषा): या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे
  • SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट मिळणार आहे
  • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किती पाहिजे?

इस्रो मध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस ची डिग्री असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे.

टीप: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ डाऊनलोड करावी.

इस्रो मध्ये किती पगार मिळतो?

इस्रो मध्ये पदांच्या आवश्यकतेनुसार पगार दिला जातो. तसेच या विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदांनुसार दरमहा 21 हजार 700 ते 2 लाख 8 हजार 700 रुपये इतका पगार दिला जातो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरती दिलेल्या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 09 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी अर्ज करावा लागेल. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ पीडीएफ जरा डाऊनलोड करू शकता तसेच यांचे अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.isro.gov.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan