NCCS Pune Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. याभरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “रिसर्च असोसिएट – I, कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) / वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 मार्च 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत येथे हजर राहायचे आहेत.
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार मास्टर तसेच पीएचडी झालेला असावा, तसेच येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 28 ते 40 वर्षे इतके असावे, वयोमर्यादा पदांनुसार असेल उमेदवारांनी तपासून अर्ज करावेत.
वरील भरतीसाठी मुलाखत, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत. येथे घेतली जाणार असून, मुलाखतीची तारीख 12 आणि 13 मार्च 2024 अशी आहे. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास
अधिकृत वेबसाईट https://nccs.res.in/
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार असून, उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी अर्जासह सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.
-लक्षात घ्या सदर पदांकरीता मुलाखत 12 आणि 13 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.