Maharashtra Agriculture Universities Recruitment : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “डीन/संचालक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
कृषी विषयात पीएचडी झालेल्या उमेदवारांना संधी मिळेल.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील भरतीसाठी अर्ज अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ, (MCAER), 132/B, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे-411007 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावेत. लक्षात घ्या उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcaer.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,44,200/- रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत देखील जोडावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.