PMPML Bharti 2024 : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अंतर्गत “विपणन कार्यकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीकरिता 23 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
वरील पदासाठी उमेदवार MBA (Marketing) मध्ये सात वर्ष अनुभवी असायला हवा, उमेदवारांनी अर्जासह पीएमटी बिल्डींग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे-४११०३७ या पत्त्यावर मुलखातीसाठी वर दिलेल्या तारखेला कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
निवड प्रक्रिया !
-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवारांनी अर्जासह संबंधित पत्त्यावर 23 फेब्रुवारी 2024 रोजी हजर राहायचे आहे.
-उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे.
-मुलाखतीस येताना अर्जासह आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे देखील आवश्यक आहे.
-उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.