Pune Bharti 2024 : पुण्यातील खडकी आर्मी बेस वर्कशॉपमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदवीधारक उमेदवारांनी करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Bharti 2024 : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत “ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस” पदांच्या एकूण 283 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे. तरी अर्ज देय तारखे अगोदर करावेत.

ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) पदांसाठी उमेदवाराकडे संबंधित व्यापारात ITI/ITC असणे आवश्यक आहे तर पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांसाठी अभियांत्रिकी पदवी किंवा कोणत्याही विषयात पवीधारक असला पाहिजे.

अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकद्वारे सादर करायचे असून, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 14 वर्षे पूर्ण असले पाहिजे. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://indianarmy.nic.in/ ला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे.
-त्यासाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
-लक्षात घ्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.