Khadki Cantonment Board : पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात निघाली भरती, ‘या’ दिवशी होणार मुलाखत…

Content Team
Published:
Khadki Cantonment Board Bharti

Khadki Cantonment Board Bharti : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी उमेवारांची भरती केली जाणार आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे केली जाणार आहे सविस्तर जाणून घ्या…

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 30 मे 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी एमबीबीएस, एमएमसी नोंदणीकृत, इमर्जन्सी केस मॅनेजमेंटचा अनुभव असायला हवा.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 55 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3 या पत्त्यावर आयोजित करण्यात येईल.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 30 मे 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७५,०००/- रुपये इतका पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

-उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे.

-मुलाखत 30 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe