कोतवाल पदभरती- २०२५ करीता श्रीगोंदा येथे मंगळवारी आरक्षण सोडत

Published on -

१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोतवालांची २० पदांसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सजेनिहाय देणे आणि महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवार ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथील सभागृहात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

कोतवाल पदभरती सन २०२५ करिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसुत्रता असावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.रिक्त पदांच्या ८० टक्क्यांच्या मर्यादेत पदे भरावयाची आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील कोतवालांची एकूण २५ पदे रिक्त असून ८० टक्क्यांच्या मर्यादेत अज १, भज १, भजड १, इमाव ६, साशैमाप्र २, अधिघ २, अराखीव ७ अशी एकूण २० पदे भरावयाची आहेत.

अजनुज, पिसोरे बुद्रुक, येळपणे, वेळू, पेडगाव, मदेवडगाव, काष्टी, बेलवंडी बु, लोणी व्यंकनाथ, पांढरेवाडी, कोकणगाव, राजापूर, लिंपणगाव, बनपिंप्री, चिंभळा, चांडगाव, खांडगाव, बाबुडर्डी, भानगाव आणि सुरोडी या तलाठी सजात कोतवाल पद रिक्त आहे.

समांतर आरक्षण हे फक्त महिला प्रवर्गाकरीता लागू राहील.श्रीगोंदा तालुक्यातील कोतवाल पद प्रथम रिक्त झालेल्या २० गावांची निवड प्रवर्गनिहाय आरक्षण सोडतीसाठी ठेवण्यात आल्याचे तहसीलदार श्रीगोंदा यांनी कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe