जॉब्स

MPKV Rahuri Bharti 2024 : अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठात निघाली भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन…

Published by
Ahmednagarlive24 Office

MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “यंग प्रोफेशनल II, यंग प्रोफेशनल I” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

एम. टेक. ऍग्रील. इंजी. कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी / प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी इ. किंवा M. Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी वनस्पतिशास्त्र (आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन/ वनस्पती शरीरविज्ञान) / कृषीशास्त्र, M. Sc. रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञानासह किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mpkv.ac.in/ ला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35000/- रुपये वेतन मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज पूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office