जॉब्स

Mahavitaran Bharti 2024: महावितरणमध्ये 5 हजारपेक्षा जास्त जागांवर भरती होण्याची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी थोडे दिवस आहेत शिल्लक

Published by
Ajay Patil

Mahavitaran Bharti 2024:- नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींकरिता सध्याचा कालावधी हा खूप मोठ्या प्रमाणावर संधीचे सोने करणारा असून अनेक विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्त जागांकरिता भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येत आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर विविध बँकेच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणीकरिता देखील हा कालावधी महत्त्वाचा असून या कालावधीत अनेक बँकांच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच शिक्षक भरती आणि जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांतर्गत देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.

अगदी याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरण देखील 5000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवत असून इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी या संधीचे सोने करण्याची गरज आहे. या लेखात आपण या भरतीप्रक्रिया विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

महावितरणमध्ये 5347 पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणे सुरू झाले असून या भरती विषयीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 5347 पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे महावितरण मध्ये नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

कुठल्या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार असून शैक्षणिक पात्रता किती आहे?
महावितरणच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही भरती प्रामुख्याने विद्युत सहाय्यक या पदांसाठी घेतली जात असून बारावी पास असलेल्या उमेदवारांना याकरिता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे बारावी पास उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. जर आपण उमेदवाराच्या वयाचा विचार केला तर याकरिता इच्छुक व पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 27 असणे गरजेचे आहे.

तसेच इच्छुक पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ते 20 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घेणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे वेळ न दवडता शक्य तितक्या लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.

या ठिकाणी करता येईल ऑनलाइन अर्ज
महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://www.mahadiscom.in/ या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. या ठिकाणी तुम्ही या भरती विषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ शकतात.

किती लागेल अर्जासाठी शुल्क?
महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विद्युत सहाय्यक या पदासाठीच्या या भरती प्रक्रिया करिता अर्ज शुल्क आकारले जाणार असून ते 250 रुपये इतके लागेल व इतर प्रवर्गातील उमेदवारांना 125 रुपये शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil