MHADA Bharti 2024 : म्हाडा अंतर्गत नवीन भरती, लवकर करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHADA Bharti 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबई येथे होत असून, यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवू शकतात.

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत “कायदेशीर फर्म / कायदेशीर सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर यासाठी शैक्षणिक पात्रता असणे देखील गरजेचे आहे. ही भरती मुंबई येथे सुरु असून उमेदवार
व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, कार्यालय: युनिट क्र. 32, तिसरा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. या पत्त्यावर 19 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://mahahousing.mahaonline.gov.in/ ला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.
-अर्ज 9 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.